नवी दिल्ली : सध्या अनेक गॅजेट्स लाँच केले जात आहेत. त्यात Samsung ने त्यांचा AI बेसड् प्रोजेक्टर लाँच केला आहे. कंपनीने जागतिक स्तरावर Freestyle+ लाँच केला आहे, ज्यामध्ये शक्तिशाली फीचर्स देण्यात आले आहेत. या सॅमसंग प्रोजेक्टरमध्ये एआय फीचर्स आणि पोर्टेबल डिझाईन दिले गेले आहे. कंपनीने सीईएस २०२६ च्या आधी त्याचे लाँचिंग केले आहे. हा प्रोजेक्टर मूळ फ्रीस्टाइल डिझाइनवर बनवला आहे.
एआय फीचर्सचा समावेश ग्राहकांना चांगला अनुभव देईल. हा प्रोजेक्टर एआय-आधारित स्क्रीन ऑप्टिमायझेशन, हाय ब्राइटनेस आणि बिल्ट-इन मनोरंजन फीचर्ससह येतो. तो कमीत कमी सेटअपसह वापरता येतो. Freestyle+ हे एआय ऑप्टीस्क्रीनवर बनवले आहे, सॅमसंगचे एआय-चालित स्क्रीन ऑप्टिमायझेशन तंत्रज्ञान, जे प्रोजेक्शन वातावरणानुसार चित्र अॅडजस्ट करतो. ही प्रणाली विविध भाग आणि खोलीच्या परिस्थितीशी अॅडजस्ट करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.
याचा अर्थ प्रोजेक्टर खोलीतील प्रकाशयोजना, प्रोजेक्शन भिंतीचा रंग आणि आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी स्क्रीन ऑटोमॅटिक करू शकतो. यात 3D ऑटो कीस्टोन फीचर्सही मिळाले आहे. जे आपोआप इमेज दुरुस्त करते. प्रोजेक्शन स्क्रीन सपाट नसल्यास हे चित्र दिसताना अडचणी येऊ शकतात. मात्र, या प्रोजेक्टरच्या माध्यमातून तसे होणार नाही. अडचणी दूर होऊ शकणार आहेत.


