नवी दिल्ली : सध्या Vivo, Realme, Samsung सह इतर अनेक कंपन्यांकडून स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. त्यात आता Samsung ने बजेट रेंजमध्ये अनेक स्मार्टफोन लाँच केले आहेत. कंपनीने भारतात Galaxy A07, Galaxy A07 F07 आणि Galaxy M07 4G हे फोन्स लाँच केले आहेत. या सर्व फोनमध्ये बरेच फीचर्स सारखेच आहेत. मात्र, Samsung ने 50MP कॅमेरा असणारा स्मार्टफोन लाँच केला आहे.
Samsung च्या या तिन्ही स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा HD LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक हेलियो G९९ प्रोसेसर आहे. त्यामध्ये 50MP चा रियर कॅमेरा आणि 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. Galaxy A07 4G ८९९९ मध्ये लाँच करण्यात आला आहे. तो तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो. ब्लॅक, ग्रीन आणि लाईट जांभळा असे कलर मिळणार आहेत. तुम्ही हा फोन सॅमसंगच्या अधिकृत स्टोअरमधून ऑनलाईन खरेदी करू शकता. कंपनीने गॅलेक्सी F07 हा ७६९९ किमतीत लाँच केला आहे.
तुम्हाला हा फोन फक्त ग्रीन या एकाच कलरमध्ये उपलब्ध असणार आहे. तुम्ही फ्लिपकार्टवरून स्मार्टफोन खरेदी करू शकता. कंपनीने गॅलेक्सी M07 4G हा ६९९९ किमतीत लाँच केला आहे. हा हँडसेट केवळ Amazon वर उपलब्ध असेल. हे सर्व हँडसेट ४GB RAM आणि ६४GB स्टोरेजमध्ये उपलब्ध असतील.
तीनही फोन्समध्ये फीचर्स सामान्य
तिन्ही सॅमसंग फोनमध्ये सामान्य फीचर्स देण्यात आले आहेत. सर्व डिव्हाइसेस ६.७-इंच HD+ PLS LCD डिस्प्लेसह येतात. ही स्क्रीन ९०Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. स्मार्टफोनचे वजन १८४ ग्रॅम आहे आणि ते IP54 रेटिंगसह येते. Galaxy A07, Galaxy F07 आणि Galaxy M07 हे MediaTek Helio G99 प्रोसेसरद्वारे काम करणार आहे.


