नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. त्यात प्रसिद्ध कंपनी Xiaomi ने भारतात नवा Redmi 15A 5G नवीन स्मार्टफोन लाँच केला. कंपनीने त्याच्या लाँचिंगची तारीख निश्चित केली असून, हा बजेट 5G फोन २७ मार्च रोजी भारतात आणला जाणार आहे.
शाओमीने एक टीझर प्रसिद्ध केला आहे आणि The Rear Hero या टॅगलाइनसह त्याची ओळख करून दिली आहे. कंपनीने याचा डिस्प्ले, प्रोसेसर, कॅमेरा आणि टिकाऊपणा याला त्याच्या सेगमेंटमधील सर्वोत्तम हँडसेट बनवेल. कंपनीने यामध्ये ६३००mAh बॅटरी दिली आहे. जे लोक आपला स्मार्टफोन दैनंदिन कामे, गेमिंग आणि चित्रपट पाहण्यासाठी वापरतात, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. Redmi 15A 5G मध्ये १२०Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे. हा फोन त्याच्या सेगमेंटमधील सर्वात मोठ्या डिस्प्लेसह आणि स्मूथ परफॉर्मन्ससह मिळणार आहे.
Redmi 15A 5G मध्ये आकर्षक डिझाइन आणि अनेक प्रभावी फीचर्स असणार आहेत. Redmi 15A 5G च्या मागील पॅनलवर एक आकर्षक, आधुनिक कॅमेरा मॉड्यूल आहे. यात एआय (AI) कॅमेरा सेटअप असणार आहे. हा हँडसेट ब्लॅक, स्लीक लाईट ब्लू आणि लॅव्हेंडर या तीन आकर्षक कलर पर्यायात उपलब्ध असणार आहे.
10000 रुपयांपर्यंत मिळण्याची शक्यता
Redmi 15A 5G च्या किंमतीबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, हा फोन इतर ब्रँड्सपेक्षा स्वस्त असण्याची अपेक्षा आहे. त्याची किंमत 10000 रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.


