मुंबई : कोणताही सिनेमा असो तो चांगला बनवण्याचा दिग्दर्शकासह त्यातील अभिनेत्यांचा प्रयत्न असतो. त्यातच चित्रपटांमधील रोमँटिक सीनच्या चित्रीकरणादरम्यान कलाकारांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. आरामदायक वाटणे, सह-कलाकारांशी चांगले संबंध निर्माण करणे आणि सेटवर सकारात्मक वातावरण राखणे या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. इंटिमेट सीनच्या चित्रीकरणादरम्यान कलाकारांनी मर्यादा ओलांडल्याची उदाहरणे आहेत.
अनेक कलाकार रोमँटिक सीनच्या चित्रीकरणादरम्यान भावनिक झाले. त्यांचे पडद्यावरील प्रेमप्रकरण खऱ्या आयुष्यात उतरले आणि त्यांना त्यांच्या वागणुकीबद्दल माफीही मागावी लागल्याची अनेक प्रकरणे आहेत. रुस्लान मुमताजशी संबंधित एक घटना प्रसिद्ध आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘आय डोन्ट लव्ह यू’ या चित्रपटातील एका इंटिमेट सीनदरम्यान रुस्लान आउट ऑफ कंट्रोल झाला होता. या रोमँटिक सीनच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेत्याने सह-अभिनेत्री चेतनाच्या ड्रेसची झिप उघडली होती.
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचे प्रेमप्रकरण काही गुपित नाही. ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटाच्या सेटवर त्यांचे प्रेम फुलले. ते एका जिव्हाळ्याच्या दृश्यात इतके रमून गेले होते की दिग्दर्शकाने ‘कट’ म्हटल्यावरही ते थांबले नाहीत. त्यांचे चुंबन दृश्य सुरूच राहिले. या काळात ते दोघे एकमेकांना डेट करत होते.
इतकेच नाहीतर रणबीर कपूर आणि एव्हलिन शर्मा यांनी ‘ये जवानी है दीवानी’ या चित्रपटात एकत्र काम केले. त्यांच्यात एक प्रणयदृश्य होते. ते त्यात इतके रमून गेले की, त्यांनी दिग्दर्शकाच्या सल्ल्याकडेही दुर्लक्ष केले, असे वृत्त आहे.


