नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन लाँच होत आहेत. त्यात आता प्रसिद्ध कंपनी Xiaomi ने भारतात एक नवीन स्मार्टफोन Redmi 15C 5G लाँच केला आहे. हा कंपनीचा बजेट 5G हँडसेट असणार आहे, ज्यामध्ये 6000mAh बॅटरी, 6.9-इंच डिस्प्ले आणि MediaTek Dimensity 6300 चिपसेट आहे. यांसह इतर अनेक बेस्ट असे फीचर्स मिळणार आहेत.
Xiaomi च्या नव्या Redmi 15C 5G मध्ये 8GB RAM आणि 8GB व्हर्च्युअल रॅम मिळू शकणार आहे. Redmi 15C 5G ची सुरुवातीची किंमत 4GB + 128GB मॉडेलसाठी 12499 आहे. 6GB + 128GB मॉडेलची किंमत 13999 आहे. टॉप-एंड व्हेरिएंट, ज्यामध्ये 8GB + 128GB मॉडेल समाविष्ट आहे, त्याची किंमत 15499 आहे. कंपनीचा दावा आहे की तो एका चार्जवर दोन दिवसांपेक्षा जास्त काळ टिकेल. हा हँडसेट ११ डिसेंबरपासून शाओमीच्या अधिकृत पोर्टल Amazon.in आणि शाओमी रिटेलवरून खरेदीसाठी उपलब्ध असेल.
Redmi 15C 5G तीन कलर पर्यायात उपलब्ध असणार आहे. यात डस्क पर्पल, मूनलाइन ब्लू आणि मिडनाईट ब्लॅक आहेत. कंपनीने दोन वर्षांचे सॉफ्टवेअर अपडेट्स आणि चार वर्षांचे सुरक्षा अपडेट्स देणार असल्याचे सांगितले आहे. Redmi 15C 5G मध्ये २०:९ आस्पेक्ट रेशोसह ६.९-इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिला गेला आहे. हा हँडसेट १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ६६० निट्सच्या पीक ब्राइटनेससह येतो.


