Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

इंदापूर नगरपरिषदेत अटीतटीची लढत! अजित पवार गटाच्या भरत शहा विजयी, प्रदीप गारटकर यांचा पराभव

इंदापूर नगरपरिषदेत अटीतटीची लढत! अजित पवार गटाच्या भरत शहा विजयी, प्रदीप गारटकर यांचा पराभव

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत सुरेशदास शहा यांनी कृष्णा भीमा विकास आघाडीचे उमेदवार प्रदीप प्रभाकर गारटकर यांचा १२७ मतांनी विजय मिळवून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा इंदापूर नगरपरिषदेवर फडकविला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे १४ नगरसेवक तर कृष्णा भीमा विकास आघाडीचे ६ नगरसेवक निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इंदापूर नगरपरिषदेवर सत्ता स्थापन करत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपचे नेते प्रवीण माने, प्रदीप गारटकर यांचे सत्तेचे मनसुबे धुळीस मिळविले. ही सत्ता हस्तगत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागले त्यामुळे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे किंग मेकर ठरले.

भरत शहा यांची आघाडी घेत शंभर विजय

इंदापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज दिनांक २१ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता शासकीय गोदामात सुरू झाली. मतमोजणीसाठी तीन फेऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. पाऊण तासानंतर पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला. प्रदीप गारटकर यांना ३६४१ मते तर भरत शहा यांना ३५२२ मते मिळाली. पहिल्या फेरीत गारटकर यांनी ११९ मतांची आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत भरत शहा यांनी ३८१९ मते घेतली तर प्रदीप गारटकरांना ३५४३मते मिळाली. भरत शहा यांनी १५७ मतांची आघाडी घेतली. तिसऱ्या फेरी अखेर भरत शहा यांना ९८२५ मते मिळाली तर प्रदीप गारटकर यांनी ९६९८ मते घेतली. अखेर भरत शहा यांनी १२७ मतांची आघाडी घेत शंभर नंबरी विजय मिळवला. थोडी खुशी….थोडा गम… अशी स्थिती प्रमुख लढत देणाऱ्या उमेदवारांची झाली.

गारटकरांचे पक्षाच्या विरोधात बंड

इंदापूर नगर परिषदेची निवडणूक घोषित झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या. भरत शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश देण्याच्या मुद्द्यावरून रणकंदन झाले. प्रदीप गारटकरांनी शहा यांच्या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवला होता. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भरत शहा यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात आग्रही भूमिका घेतली. त्यामुळे गारटकरांनी पक्षाचे विरोधात बंड पुकारले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदाचा व पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजप नेते प्रवीण माने, प्रदीप गारटकर यांनी कृष्णा भीमा विकास आघाडीची निर्माण केली.

पैसे वाल्यांना उमेदवारी पक्षाकडून दिले जाते म्हणून आम्ही तीन नेत्यांनी एकत्र येऊन स्थानिक आघाडी तयार केली असल्याचे प्रदीप गारटकर यांनी सांगितले. प्रचारामध्ये अनेक आरोप भरत शहा यांच्यावर करण्यात आले. शहा यांनी आरोपांना चोख उत्तर दिले. माजी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांच्या कार्यकाळात स्वच्छ सर्वेक्षणाची सलग पाच वर्ष केंद्र सरकारकडून पारितोषिक घेतली. थकित पाच कोटी रुपये वीज बिल विद्युत वितरण कंपनीला दिले त्यामुळे इंदापूर शहर प्रकाशमान झाले, यासह अनेक विकास कामांच्या संदर्भात प्रचारामध्ये अंतर्भाव होता. भविष्यात शहरवासींसाठी करण्यात येणाऱ्या विकास योजना संदर्भात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, अप्पासाहेब जगदाळे, स्वतः भरत शहा बोलत होते तर दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन पाटील, दशरथ माने, प्रदीप गारटकर, प्रवीण माने आदी मंडळी भरत शहा यांच्यावर टीका करत होती. यामुळे इंदापूर नगरपरिषदेची निवडणूक प्रचंड अटीतटीची झाली. निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे असलेले उमेदवार तुल्यबळ असल्यामुळे घासून लढत झाली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!