Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोठी बातमी! काँग्रेसच्या गोटात खळबळ, 7 नगरसेवकांचं थेट निलंबन; हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट कारवाई का केली?

मोठी बातमी! काँग्रेसच्या गोटात खळबळ, 7 नगरसेवकांचं थेट निलंबन; हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट कारवाई का केली?

Congress: काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली आहे. एकाच झटक्यात सात नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी उगारला कारवाईचा बडगा. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला काही ठिकाणी चांगले यश मिळाले. मात्र, निकालानंतर पक्षशिस्त भंग करत काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी भाजपला उघडपणे साथ दिल्याचे समोर आले. या प्रकरणात काँग्रेसने कठोर भूमिका घेतली असून, एकाच झटक्यात सात नगरसेवकांना निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वी अंबरनाथ महानगरपालिकेतही काँग्रेसने अशीच कारवाई केली होती.

जालना महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या नियुक्ती प्रक्रियेदरम्यान काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी पक्षाच्या ध्येयधोरणांना बगल देत भाजपच्या उमेदवारांना मदत केल्याचे चौकशी अहवालातून उघड झाले. पक्षादेश (व्हीप) धाब्यावर बसवून भाजपला सहकार्य केल्यामुळे पक्षाची मोठी नाचक्की झाली होती.

काँग्रेस कमिटीने केली कठोर कारवाई

या गंभीर प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने कठोर कारवाई केली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने या सातही नगरसेवकांना पक्षातून निलंबित करण्याचा अधिकृत कार्यालयीन आदेश जारी करण्यात आला आहे.

निलंबित झालेल्या नगरसेवकांची नावे:

-फारूक सादीक तुंडीवाले

-इमरान खान आमानुल्ला खान

-फरहाना अब्दुल रऊफ अंसारी

-सुनिल अशोक बोरडे

-मयूरी दिनेश देने

-रुबीना मजीद पठाण

-अनिल अशोक तिरुखे

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!