Today रविवार, 20th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

दिवाळीत रेल्वेची फुकट्यांवर मोठी कारवाई! पुणे विभागाने वसूल केला 1.14 कोटी दंड

दिवाळीत रेल्वेची फुकट्यांवर मोठी कारवाई! पुणे विभागाने वसूल केला 1.14 कोटी दंड

पुणे: दिवाळीच्या सुट्टीत वाढलेल्या प्रवासी गर्दीत तिकीटविरहित प्रवासाला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. पुणे रेल्वे विभागाने केवळ १० दिवसांत म्हणजेच १७ ते २७ ऑक्टोबरदरम्यान तब्बल १०,६०३ प्रवाशांना तिकीटाशिवाय प्रवास करताना पकडले आणि त्यांच्याकडून १.१४ कोटींचा विक्रमी दंड वसूल केला आहे रेल्वेने हा उपक्रम ‘दिवाळी विशेष तपासणी मोहीम’ म्हणून राबवला होता. पुणे, लोणावळा, दौंड, सातारा आणि कोल्हापूरसह प्रमुख स्थानकांवर विशेष तिकीट तपासणी पथके नेमण्यात आली होती. अचानक छापे आणि दररोजच्या तपासणींमुळे अनेक प्रवासी तिकीटाशिवाय प्रवास करताना आढळले.

गेल्या वर्षाच्या तुलनेत मोठी वाढ
२०२४ मध्ये याच काळात ८,५५७ प्रवाशांकडून ४६.३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला होता. यंदा प्रवाशांची संख्या २४% नी वाढली, तर दंड वसुलीत तब्बल १४७% वाढ झाली आहे. हे आकडे रेल्वेच्या कठोर कारवाई आणि प्रवासी जबाबदारी वाढवण्याच्या प्रयत्नांचे निदर्शक आहेत. दरम्यान, पुणे विभागाचे विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक हेमंत बेहरा म्हणाले, ‘आमचे उद्दिष्ट केवळ दंड आकारणे नाही, तर प्रवाशांना वैध तिकीट घेण्याचे महत्त्व पटवून देणे आहे. आमचे तिकीट तपासणी कर्मचारी सतत कामावर आहेत. ही मोहीम सणासुदीच्या हंगामानंतरही सुरू ठेवली जाणार आहे.’

हेही वाचा – Pune Airport: पुणे विमानतळ अव्वल! देशातील सर्व विमानतळांना टाकलं मागे

प्रवाशांसाठी रेल्वेचे आवाहन
पुणे विभागाने प्रवाशांना आयआरसीटीसी आणि यूटीएस मोबाइल अॅप सारख्या अधिकृत डिजिटल माध्यमांतून तिकीट खरेदी करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून दंड टाळता येईल आणि प्रवास निर्विघ्न पार पडेल. दिवाळीच्या गर्दीत तिकीट नसलेल्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाने घेतलेली ही कडक भूमिका केवळ शिस्त राखण्यासाठीच नव्हे, तर प्रवास संस्कृतीत जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!