Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Leopard News : मंचरमध्ये नरभक्षक बिबट्या जेरबंद; शरीरात मानवी अंश असल्यास ठार करणार?

Pune Leopard News : मंचरमध्ये नरभक्षक बिबट्या जेरबंद; शरीरात मानवी अंश असल्यास ठार करणार?

Pune Leopard News : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळखेड परिसरात गेल्या महिनाभरात नरभक्षक बिबट्याने तिघांचा बळी घेतला असून, यामुळे स्थानिकांच्या दहशतीत वाढ झाली आहे. १२ ऑक्टोबरला साडेपाच वर्षांच्या शिवण्या बोंबे, २२ ऑक्टोबरला ७० वर्षांच्या भागुबाई जाधव आणि २ नोव्हेंबरला १३ वर्षांच्या रोहन बोंबे या तिघांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला.

या घटनांमुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी सोमवारी नाशिक-पुणे महामार्ग रोखून धरला आणि वन विभागाच्या वाहनाला आग लावली. तब्बल १६ तासांच्या आंदोलनानंतर पोलिस आणि प्रशासनाच्या समजुतीनंतर रात्री सव्वाआठ वाजता रास्ता रोको मागे घेण्यात आला. वन विभागाने नागरिकांच्या ११ मागण्या मान्य केल्या असून, रोहनच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

दरम्यान, नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग आणि खासगी संस्थांनी ठिकठिकाणी ११ पिंजरे लावले होते. यापैकी मंचर परिसरातील एका पिंजऱ्यात एक बिबट्या सापडला आहे. मात्र, हा बिबट्या नरभक्षक आहे की नाही, याची पुष्टी होण्यासाठी त्याच्या शरीरात मानवी अवयवांचे अस्तित्व तपासले जाईल.

डीएनए तपासणीसाठी स्वॅब्स घेतले जातील आणि जर ते मानवी अंशांशी जुळले, तर या बिबट्याला गोळ्या घालून ठार मारण्याचा निर्णय घेतला जाईल. वन विभागाने आधीच ‘शूटिंग ऑर्डर्स’ जारी केले असून, पाच शार्पशूटर्सच्या पथकांनी परिसरात सतर्कता वाढवली आहे.

या परिसरातील बिबट्यांचे मानवांवर हल्ले वाढत असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या चार तालुक्यांत सुमारे १२०० बिबटे असून, १० चौरस किलोमीटर क्षेत्रात एक बिबट्या असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. स्थानिक राजकारण्यांनी ‘बिबटे वाचवायचे की माणसे वाचवायची?’ असा प्रश्न उपस्थित केला असून, वन विभागाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मंगळवारी वनमंत्री मंत्रालयात बिबट्यांवर नियंत्रणासाठी महत्त्वाची बैठक होणार असून, यात उपाययोजना ठरवल्या जाणार आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!