मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. गेल्यावर्षी शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. तरीही, मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या देशातील १० सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी चार कंपन्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना लक्षणीय नफा दिला. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने सर्वाधिक नफा कमावला.
गुंतवणूकदारांनी फक्त पाच दिवसांत ४७००० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली. दुसरीकडे, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिस सारख्या प्रमुख कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. सेन्सेक्सच्या टॉप १० कंपन्यांमध्ये, ज्या चार कंपन्यांचे बाजारमूल्य गेल्या आठवड्यात वाढले त्या चार कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, एसबीआय, भारती एअरटेल आणि एलआयसी यांचा समावेश आहे. या चार कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य ९५४४७ कोटी रुपयांनी वाढले.
दुसरीकडे, तोट्यात असलेल्या सहा कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, इन्फोसिस आणि एचयूएल यांचा समावेश आहे. त्यांचे एकत्रित बाजार भांडवल ९१६८५.९४ कोटींनी कमी झाले. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज बाजार मूल्याच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. गेल्या आठवड्याच्या पाच दिवसांत तिचे बाजार भांडवल पुन्हा एकदा २० लाख कोटींपेक्षा जास्त झाले


