Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कतरिना कैफने दिला गोंडस बाळाला जन्म! जाणून घ्या मुलगा झाली की, मुलगी

कतरिना कैफने दिला गोंडस बाळाला जन्म! जाणून घ्या मुलगा झाली की, मुलगी

Vicky Kaushal and Katrina Kaif Blessed With Baby Boy: बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी अखेर त्यांच्या चाहत्यांसोबत एक मोठी आनंदाची बातमी शेअर केली आहे. लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या तोंडावरच या स्टार कपलने त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचं स्वागत केलं आहे. कतरिना आणि विकी आता एका गोंडस मुलाचे आई-वडील झाले आहेत. या जोडीने सोशल मीडियावर एक संयुक्त पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे, ‘आमच्या आयुष्यात आमच्या आनंदाचं गाठोडं आलं आहे. खूप साऱ्या प्रेमाने आणि कृतज्ञतेने आम्ही आमच्या बाळाचं या जगात स्वागत करतो.’ या पोस्टसोबत त्यांनी टेडी बेअर असलेले एक सुंदर ग्राफिक देखील शेअर केलं आहे आणि त्याखाली तारीख लिहिलीय ७ नोव्हेंबर २०२५. पोस्ट पाहताच चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.

सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

घोषणेनंतर काही तासांतच #VickyKatrinaParents हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. मनीष पॉल, गुनीत मोंगा, आणि अनेक सहकलाकारांनी “Congratulations!” म्हणत कमेंट्स केल्या. चाहत्यांनी या जोडप्याचे फोटो आणि त्यांचा आनंद शेअर करत “Made for each other” अशा प्रतिक्रिया दिल्या. कतरिना आणि विकी काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. त्यामुळे चाहत्यांमध्ये तिच्या गरोदरपणाबद्दल अंदाज सुरू झाले होते. अखेर त्या चर्चा खरी ठरल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

प्रेमकहाणीपासून पालकत्वापर्यंतचा प्रवास

कतरिना आणि विकीची जोडी २०१९ मध्ये चर्चेत आली. विकीने कॉफी विथ करण या शोदरम्यान मजेशीर अंदाजात कतरिनाला प्रपोज केलं होतं. त्यानंतर दोघांना अनेक कार्यक्रमांत आणि सुट्ट्यांमध्ये एकत्र पाहिलं गेलं, मात्र त्यांनी नात्याबद्दल कधीही उघडपणे बोललं नाही. 2021 मध्ये त्यांच्या लग्नाची बातमी समोर आली आणि चाहत्यांमध्ये जल्लोष उसळला. ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानमधील सिक्स सेन्सेस फोर्ट बरवाडा येथे त्यांच्या लग्नाचा भव्य समारंभ पार पडला. आता, चार वर्षांनी या जोडप्याने पालकत्वाचा सुंदर प्रवास सुरू केला आहे. चाहत्यांना त्यांच्या लहानग्याचा पहिला फोटो पाहण्याची उत्सुकता लागली आहे. सध्या ही जोडी मुंबईतच आहे आणि नातेवाईकांसह आनंद साजरा करत असल्याचे वृत्त आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!