Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणेकरांना मोठा दिलासा! PMPML ताफ्यात 1000 नव्या ई- बसेस सामील होणार

पुणेकरांना मोठा दिलासा! PMPML ताफ्यात 1000 नव्या ई- बसेस सामील होणार

पुणे: शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे. केंद्र सरकारने पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) साठी तब्बल 1,000 नवीन इलेक्ट्रिक बस मंजूर केल्या आहेत. या बस “PM e-Drive Scheme” अंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात धावणार आहेत. केंद्रीय जड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी (H.D. Kumaraswamy) यांनी या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे पुण्याची सार्वजनिक वाहतूक अधिक आधुनिक, पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम बनणार आहे. नव्या ई-बस ताफ्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल, प्रदूषणावर नियंत्रण येईल आणि नागरिकांना अधिक आरामदायक, स्वस्त आणि जलद प्रवासाचा अनुभव मिळेल.

दीर्घ प्रयत्नांनंतर मंजुरी

या प्रस्तावावर गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात सातत्याने चर्चा सुरू होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रक्रियेला गती देत रिझर्व्ह बँक आणि जड उद्योग मंत्रालयाच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले. शेवटी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला.

हेही वाचा – लग्नापूर्वीचं जोडप्याने स्टेशनवर केलं ‘असं’ काम की, पुणे मेट्रोने ठोठावला दंड

पुणे मेट्रो आणि ई-बसचे एकत्रीकरण

सध्या पुणे शहरातील मेट्रो सेवा 32 किमीपर्यंत धावत असून शिवाजीनगर–हिंजवडी मार्ग लवकरच सुरू होणार आहे. या नवीन ई-बस ताफ्यामुळे मेट्रो आणि बस या दोन्ही वाहतूक साधनांचे एकत्रीकरण होऊन शहर “स्मार्ट, ग्रीन आणि सस्टेनेबल सिटी (Smart, Green & Sustainable City)” या संकल्पनेच्या दिशेने मोठी झेप घेईल.

पुणेकरांसाठी ऐतिहासिक टप्पा

खासदार मुरलीधर मोहोळ यांनी या निर्णयाचे स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. त्यांनी या प्रकल्पाला “पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बळकटीकरणाचा ऐतिहासिक टप्पा” असे संबोधले. आगामी काही वर्षांत, या नव्या इलेक्ट्रिक बसमुळे पुणे शहर “इलेक्ट्रिक गतिशीलतेचे राष्ट्रीय मॉडेल” म्हणून ओळखले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!