Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला मोठा दिलासा! ‘तुतारी’ सदृश ‘पिपाणी’ चिन्ह वगळले

निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला मोठा दिलासा! ‘तुतारी’ सदृश ‘पिपाणी’ चिन्ह वगळले

मुंबई: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ‘तुतारी’ या राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या चिन्हाशी साधर्म्य असलेल्या ‘पिपाणी’ या निवडणूक चिन्हामुळे पक्षाला मोठा फटका बसल्याचा दावा करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने ‘पिपाणी’ हे चिन्ह कायमस्वरूपी गोठविण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. अखेर आयोगाने ती मागणी मान्य करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या १९४ मुक्त चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ हे चिन्ह वगळले आहे.

या निर्णयामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, ‘पिपाणी’ आणि ‘तुतारी’ या नावांतील साम्यामुळे अनेक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परिणामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत अपक्ष उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मते मिळाल्याचा दावा राष्ट्रवादीने केला होता. लोकसभेत रावेर, दिंडोरी, भिवंडी, बारामती, शिरुर, अहमदनगर, बीड आणि सातारा या मतदारसंघांमध्ये ‘पिपाणी’ चिन्हावर लढलेल्या उमेदवारांना हजारोंच्या संख्येने मते मिळाली होती. उदाहरणार्थ, रावेर येथे एकनाथ साळुंके यांना तब्बल ४३,९५७ मते मिळाली, तर दिंडोरीत बाबू भगरे यांना १,०३,६३२ मते मिळाली होती.

हेही वाचा – बीडमधील राजकीय गणित बिघडणार? ‘हा’ बडा नेता सोडणार शरद पवारांची साथ

विधानसभा निवडणुकांमध्येही अनेक मतदारसंघांत हीच परिस्थिती दिसून आली. जिंतूर, बेलापूर, आंबेगाव, पारनेर, केज, परांडा आदी ठिकाणी अपक्ष उमेदवारांच्या ‘पिपाणी’ चिन्हाला अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली. राष्ट्रवादीकडून असा दावा करण्यात आला होता की, ही मते विभागली नसती, तर पक्षाचे १९ आमदार निवडून आले असते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे आता ‘तुतारी’ चिन्हाशी साम्य असलेले कोणतेही चिन्ह निवडणूक यादीत राहणार नाही, आणि शरद पवार गटाला भविष्यात अशा गोंधळाचा फटका बसणार नाही.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!