Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

इंदापूरमधील राजकारण तापलं! उमेदवार निवडीवरून अजित पवारांच्या पक्षात बंडाचा झेंडा

इंदापूरमधील राजकारण तापलं! उमेदवार निवडीवरून अजित पवारांच्या पक्षात बंडाचा झेंडा

Indapur Politics: इंदापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात उमेदवार निवडीच्या प्रक्रियेवरून मोठा वाद उभा राहिला आहे. पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पक्ष नेतृत्वाला थेट बंडाचा इशारा दिल्याने इंदापूरमधील राजकारण तापले आहे. जेजुरी नगराध्यक्षपदासाठी जयदीप बारभाई यांना उमेदवारी देण्यात आल्याने आधीच नाराजी होती. आता नगरपरिषदेच्या उमेदवारीवरून गारटकर यांनी पक्ष नेतृत्वासह मतभेद उघड केले आहेत.

अजित पवार आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या बैठकीत मतभेद स्पष्ट झाले. माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना उमेदवारी देण्याच्या प्रयत्नांना गारटकर गटाने तीव्र विरोध दर्शविला. यानंतर गारटकर यांनी इंदापूरमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपली भूमिका ठामपणे मांडली.

हेही वाचा – इंदापूर नगरपालिका निवडणुकीचे राजकीय गणित अजूनही गुंतागुंतीचे! पाटील विरुद्ध गारटकर संघर्ष पुन्हा रंगणार?

गारटकर म्हणाले, ‘आमच्यामुळेच तुम्ही मंत्री झाला आहात. जर आमच्याशी अन्याय झाला तर आम्हीही पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही. पक्षाने आमच्या भावना मान्य केल्या तर आम्ही अजित पवारांसोबत राहू. अन्यथा राजीनामा देऊन स्वतंत्र आघाडी उभी करू. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रतीक्षा करू, पण अन्याय सहन करणार नाही.’

सध्या इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) दोन गटांत विभागला गेला आहे. गारटकर समर्थकांनी पक्षाविरोधात उभे राहण्याची तयारी दाखवली असून, भाजप आणि शरद पवार गटासोबत नव्या आघाडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संभाव्य बंडखोरीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. इंदापूरमधील या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव वाढला असून, पुढील काही दिवसांत परिस्थिती कोणत्या दिशेने जाते याकडे राजकीय धुराणींचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!