Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

भायखळ्यातील राणी बागेत वाघाचा संशयास्पद मृत्यू; 8 दिवस माहिती लपवून ठेवल्याने उद्यान प्रशासनावर प्रश्नचिन्ह

भायखळ्यातील राणी बागेत वाघाचा संशयास्पद मृत्यू; 8 दिवस माहिती लपवून ठेवल्याने उद्यान प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Mumbai Ranichi Baug: मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘शक्ती’ नावाचा नर वाघ संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळला असून, या घटनेने प्राणीसंग्रहालयाच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. 2020 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथून मुंबईत आणलेल्या या वाघाचे वय मृत्यूच्या वेळी अंदाजे 10 वर्षे होते.

मृत्यूचे कारण काय?

प्राथमिक माहितीनुसार, वाघाला अचानक झटके आल्याने किंवा मांस खाताना श्वसननलिकेत हाड अडकल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र त्या क्षणी योग्य उपचार का मिळाले नाहीत? हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे वाघाचा मृत्यू झाल्यानंतर आठ दिवस ही घटना प्राणीसंग्रहालयाने गोपनीय ठेवली, ज्यामुळे संशय अधिकच वाढला आहे.

हेही वाचा –बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे औंधमध्ये बिबट्या दिसल्याने शहरात खळबळ

व्यवस्थापनावर गंभीर आरोप

व्याघ्रप्रेमी प्रथमेश जगताप यांनी प्रशासनावर थेट हलगर्जीपणाचे आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार वाघाच्या मृत्यूची माहिती त्वरित देण्याऐवजी ती लपवण्यात आली. तसेच पीडित वाघाला आवश्यक ती वैद्यकीय सेवा वेळेवर मिळाली नाही. तथापी, मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल येण्याआधीच त्याची विल्हेवाट लावण्यात आली. तसेच महाराष्ट्र झू अथॉरिटी आणि सेंट्रल झू अथॉरिटीला केवळ ई-मेलद्वारे याबाबत माहिती देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. जगताप यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

प्राणीसंग्रहालयाची भूमिका विवादात

उद्यान प्रशासनाचे म्हणणे आहे की, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची परवानगी न मिळाल्याने त्यांनी मृत्यूची माहिती सार्वजनिक केली नाही. पण आयुक्तांनी परवानगी का दिली नाही? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!