Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

प्राजक्ता पाटील यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा ! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचे अपील अर्ज फेटाळला

प्राजक्ता पाटील यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा ! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचे अपील अर्ज फेटाळला

Ujwala Thite Appeal Dismissed: अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवर काही दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळाचा अखेर निर्णय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी आपला उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर सोलापूर सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अपीलावर आज निकाल देण्यात आला. दोन्ही बाजूंचे सुमारे चार तास युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने थिटे यांचे अपील फेटाळले, त्यामुळे प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून निवड कायम राहणार आहे.

थिटे यांच्या बाजूने अर्जावरील सही खोडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, यावर सरकारी बाजूने प्रतिवाद करताना, जर खरोखरच सही खोडण्यात आली असेल तर त्याबाबत ताबडतोब पोलिस तक्रार दाखल का करण्यात आली नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. न्यायालयानेही हा मुद्दा विचारात घेत थिटे यांचे अपील ग्राह्य धरले नाही.

चार तासांच्या सुनावणीनंतर निकाल

जिल्हा न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांच्या न्यायालयात उज्ज्वला थिटे, प्राजक्ता पाटील आणि सरकारी बाजूने तीनही वकिलांचे युक्तिवाद आज सकाळपासून सुरू होते. दीर्घ सुनावणी संपल्यानंतर दुपारी न्यायालयाने निकाल देत प्राजक्ता पाटील यांच्या बिनविरोध निवडीला अधोरेखित केले. थिटे यांच्या वतीने वकील दत्तात्रय घोडके यांनी युक्तिवाद करताना निवडणूक अर्ज दाखल करताना आलेल्या अडचणी आणि निर्णय अधिकाऱ्यांनी केलेल्या कृतींचा तपशील न्यायालयासमोर मांडला. त्यांनी प्रशासनानेच सही गायब केल्याचा दावा केला. जवळपास दीड तास चाललेल्या या सविस्तर युक्तिवादनंतर सरकारी वकिलांनी प्रतिउत्तर दिले.

हेही वाचा – राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंचा अर्ज छाननीत बाद; अनगर नगराध्यक्षपदासाठी BJP चा मार्ग मोकळा

सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी स्पष्ट केले की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व कामकाज आयोगाच्या नियमांप्रमाणे केले आहे. तक्रार असेल तर निवडणूक आयोगाकडे का धाव घेतली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच थिटे या राष्ट्रवादीच्या उमेदवार असल्याने पक्षानेही यात कोणतीही भूमिका घेतली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!