मुंबई : दंगल चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेली प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री फातिमा सना शेख पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. फातिमा शेख सध्या तिच्या आगामी रोमँटिक ड्रामा चित्रपट ‘गुस्ताख इश्क’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. यात फातिमाने बालपणीचे एक रहस्य उलगडले आहे, ज्यामध्ये तिने क्रशबाबत भाष्य केले.
क्रशबद्दल बोलताना फातिमा म्हणाली, ‘लहानपणी मला माझ्या गणिताच्या शिक्षकावर खूप प्रेम होते. शाळेची घंटा वाजली की मी शिक्षक कधी येतील याची वाट पाहत असे. शिक्षक कधी येतील, मी वर्गात बसून त्यांना पाहत असे. मी आधीच लहान होते आणि मला काहीही समजत नव्हते, त्यामुळे काही फरक पडत नव्हता. म्हणून जेव्हा आम्हाला आमच्या शिक्षकांनी फटकारले, तेव्हा आम्ही ते आनंदाने स्वीकारायचो. म्हणून आम्ही म्हणायचो, ‘हो, सर, तुम्ही आम्हाला अजून ओरडू शकता. आम्ही कधी त्यांना विरोध केला नाही. त्यांच्या ओरडण्याचा आम्हाला त्रासही कधी झाला नाही.
‘गुस्ताख इश्क’ २८ नोव्हेंबर अर्थात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अभिनेता विजय वर्मा यांच्यासोबत फातिमाचा पहिलाचा चित्रपट असणार आहे. विभू पुरी दिग्दर्शित आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी स्टेज ५ प्रॉडक्शन अंतर्गत निर्मित या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि शरीब हाश्मी यांच्याही भूमिका आहेत. आता हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे.


