Randeep Hooda Baby Announcement: बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडा आज त्याची पत्नी लिन लैशरामसोबत त्याचा लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने रणदीपने एक पोस्ट शेअर केली आणि त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली. अभिनेताने खुलासा केला की तो लवकरच बाबा होणार आहे. हो, रणदीप हुडाची पत्नी लिन लैशराम गर्भवती आहे आणि या जोडप्याने स्वतः त्यांच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त ही घोषणा केली.
रणदीप आणि लिन यांच्या या पोस्टमुळे त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे, अनेकांनी कमेंट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. रणदीप हुडा आणि लिन लैशरामने चाहते आणि फॉलोअर्ससोबत ही आनंदाची बातमी शेअर करताना पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘दोन वर्षांचे प्रेम, साहस आणि आता… एक छोटसं मुलं लवकरच येणार आहे.’
View this post on Instagram
हेही वाचा – कॉमेडियन कपिल शर्माने चॅनेलसोबतचा वाद अखेर संपवला;11 वर्षांपासून सुरु होता वाद
रणदीप हुडा आणि लिन लैशराम यांनी २९ नोव्हेंबर २०२३ रोजी मणिपूरमधील इम्फाळ येथे पारंपारिक विवाह सोहळ्यात लग्न केले. तोपर्यंत या जोडप्याने त्यांचे नाते खाजगी ठेवले होते. आता, लग्नाच्या दोन वर्षांनंतर, या जोडप्याने चाहत्यांना आनंदाची बातमी सांगताच, चाहते आणि इतर कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. रणदीप हुड्डाची पत्नी, लिन लैशराम एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने “जाने जान,” “मेरी कोम,” सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. २००७ मध्ये आलेल्या “ओम शांती ओम” चित्रपटातही तिची एक छोटीशी भूमिका होती.


