Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणे महापालिकेत रिपब्लिकन पक्षाला 20 जागा मिळाव्यात; रामदास आठवलेंची भाजपाकडे मागणी

पुणे महापालिकेत रिपब्लिकन पक्षाला 20 जागा मिळाव्यात; रामदास आठवलेंची भाजपाकडे मागणी

पुणे: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महायुतीकडून रिपब्लिकन पक्षाला पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे. महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढविल्या जाव्यात आणि त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला योग्य जागा मिळाव्यात. मुंबई महापालिकेत 17 ते 18 तर पुणे महापालिकेत 20 जागा मिळाव्या अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही एवढ्या जागांची मागणी भाजपकडे करणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले आहे. पुण्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

आठवले म्हणाले, पुणे महापालिकेसाठी 20 प्रभागांची यादी पक्षाने तयार केली असून ती भाजपाकडे सोपविण्यात आली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे ही यादी देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आमच्या स्थानिक नेत्यांशी निवडणुकी संदर्भात चर्चा करावी आणि योग्य प्रतिनिधित्व द्यावे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महायुतीमध्ये प्रचारादरम्यान योग्य ती विधाने करावीत

दीर्घ कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्यामुळे या निवडणुकीत इच्छुकांची संख्या जास्त आहे आणि बंडखोरीचे प्रमाणही अधिक आहे. अनेक ठिकाणी महायुतीतील पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मात्र, या निवडणुकांच्या युती, आघाडीचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले गेले असले तरी देखील प्रचारादरम्यान महायुतीमध्ये बेबनाव निर्माण होईल अशी विधाने घटक पक्षांच्या स्थानिक अथवा प्रदेश पातळीवरील नेत्यांनी करू नयेत, असे आवाहनही आठवले यांनी केले.

अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी भारतीय अर्थव्यवस्था ही मृतावस्थेत असल्याचा आरोप केला आहे. मात्र, या आरोपात कोणतेही तथ्य नाही. संयुक्त पुरोगामी आघाडी सत्तेवर असताना भारतीय अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावर होती. ती आता चौथ्या क्रमांकावर आली आहे. लवकरच की तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. याचे श्रेय निश्चितपणे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे आहे, असेही आठवले म्हणाले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!