Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘अशाप्रकारे निर्णय घेणं चुकीचंच…’; देवेंद्र फडणवीसांचा निवडणूक आयोगावर आक्षेप

‘अशाप्रकारे निर्णय घेणं चुकीचंच…’; देवेंद्र फडणवीसांचा निवडणूक आयोगावर आक्षेप

Devendra Fadnavis, On Election Commission : महाराष्ट्रातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून, न्यायालयीन प्रक्रियेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून रंगात आलेला प्रचार अचानक थांबवावा लागल्यानं उमेदवार आणि पक्ष कार्यकर्त्यांचा उत्साह एकदम मावळला आहे. ज्या नगरपरिषदांच्या निवडणुका थांबवण्यात आल्या आहेत, त्यांचा नवीन कार्यक्रम जाहीर केला आहे. येथील मतदान 20 डिसेंबर रोजी, तर मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे. उर्वरित ठिकाणी मात्र निवडणुका नियोजित वेळापत्रकानुसार 2 डिसेंबरलाच पार पडतील.

दरम्यान, या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. ‘निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. माझ्या माहितीनुसार अशा पद्धतीने निवडणुका पुढे ढकलणे शक्य नाही. उद्या निवडणुका आणि आज अचानक स्थगिती, ही अत्यंत चुकीची भूमिका आहे,’ अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगावर केली आहे. तसेच, अनेक उमेदवारांच्या महिनाभराच्या प्रचाराची मेहनत वाया गेल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. निवडणूक आयोग स्वायत्त असला तरी अशा निर्णयाविरुद्ध आम्ही रिप्रेझंटेशन सादर करू, असंही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – ‘आमचं मित्रपक्षांचं खूप पटत असलं तरी…’; स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

आज प्रचाराचा शेवटचा दिवस

नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा प्रचार आज संध्याकाळी 10 वाजता थांबणार आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी शेवटच्या दिवशी जोरदार सभा आयोजित केल्या आहेत. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ नेते आज राज्यभर प्रचारसभांमध्ये व्यस्त राहणार आहेत. मुख्यमंत्री संभाजीनगर, पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि बीडमध्ये जनसभांना उपस्थित राहणार आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि संभाजीनगरमध्ये सभा घेणार आहेत. तथापी, उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे जिल्हा आणि नाशिकच्या भगूर येथे प्रचार करणार आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!