Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मालवण निवडणुकीत पैशांचा खेळ; एकनाथ शिंदेंनी आणल्या पैशांच्या बॅगा; वैभव नाईकांच्या दाव्याने खळबळ

मालवण निवडणुकीत पैशांचा खेळ; एकनाथ शिंदेंनी आणल्या पैशांच्या बॅगा; वैभव नाईकांच्या दाव्याने खळबळ

मालवण : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीत मोठे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महायुतीतील मित्रपक्ष एकमेकांवरच टीका करत असल्याने राजकीय घमासान सुरू आहे. एकीकडे शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजपवर मतदारांना पैसे वाटपाचा आरोप केला आणि भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकून पैशांच्या बॅगा जप्त केल्या, तर आता शिवसेना (ठाकरे गट) चे माजी आमदार वैभव नाईक यांनी शिंदे गटावरच उलट आरोप केले आहेत.

वैभव नाईक यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत दावा केला आहे की, दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालवण दौऱ्यावर आले तेव्हा त्यांच्या मागे बॉडीगार्ड पैशांच्या बॅगा घेऊन कॅमेऱ्यांपासून लपण्याचा प्रयत्न करत धावत होते. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नाईक यांनी म्हटले आहे की, शिंदे यांनी आणलेल्या या पैशांचे वाटप निलेश राणे यांनी मालवणमधील मतदारांमध्ये केले आहे. हा पैसा राज्य सत्तेतून मिळालेल्या भ्रष्टाचारातून आल्याचा आणि ‘पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा’ हे शिंदे गटाचे धोरण असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

नाईक यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, मालवणच्या जनतेने विचारपूर्वक मतदान करावे आणि या पैशाच्या खेळाला उत्तर द्यावे. त्यांनी शिंदे गटाच्या धोरणांवर सडकून टीका केली असून, मतदारांना आवाहन केले आहे की, विकासाच्या नावाखाली होणाऱ्या भ्रष्टाचाराला पाठिंबा देऊ नये.

दरम्यान, निलेश राणे यांनी नोव्हेंबर महिन्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मालवण दौऱ्यानंतर भाजप कार्यकर्ता विजय केनवडेकर यांच्या घरावर धाड टाकली होती. तेथे २०-२५ लाख रुपयांच्या पैशांच्या बॅगा सापडल्याचा दावा त्यांनी केला असून, प्रति मतदार २५ हजार रुपयांचे वाटप होत असल्याचा आरोप केला होता. भाजपने हे आरोप फेटाळले असून, निवडणुकीनंतर उत्तर देण्याची ग्वाही दिली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!