Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘तो’ व्हिडिओ व्हायरल होताच अभिनेता सोहेल खानने मागितली माफी; कारण काय तर…

‘तो’ व्हिडिओ व्हायरल होताच अभिनेता सोहेल खानने मागितली माफी; कारण काय तर…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोहेल खान सध्या चर्चेत आहे. सोहेल खान हा रात्री मुंबईच्या रस्त्यांवर त्याची आलिशान बाईक चालवताना दिसला. त्याने रात्री दुचाकी रायडिंगचा पुरेपूर आनंद घेतला. पण त्याने केलेली चूक चर्चेचे कारण ठरली. सोहेल खान हा हेल्मेटशिवाय बाईक चालवण्याचा आनंद घेत असल्याचे दिसून आले. मात्र, यावर त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत माफी मागितली.

सोहेल खान मुंबईच्या रस्त्यांवर डुकाटी बाईक चालवण्याचा आनंद घेत असल्याचे दिसून आले होते. व्हायरल व्हिडिओमध्ये तो हेल्मेटशिवाय दुचाकी चालवत असल्याचे दिसले होते. जेव्हा इतर रायडर्सनी त्याला हेल्मेट घालण्यास सांगितले तेव्हा तो शिवीगाळ करतानाही दिसला. आता त्याला त्याची चूक कळाली असून, त्याने याप्रकरणावर माफी मागितली. त्याने माफी मागितली आणि लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. सोहेलने इतर रायडर्सना वचनही दिले.

सोहेलने पोस्टमध्ये लिहिले आहे, “मी सर्व दुचाकीस्वारांना विनंती करतो की, कृपया हेल्मेट घाला. मला कधीकधी हेल्मेट घालायचे टाळावे लागते. कारण मला क्लॉस्ट्रोफोबिया जाणवतो, पण ते न घालण्याचे कारण ते नाही. लहानपणापासूनच सायकल चालवणे हा माझा छंद आहे. मी BMX सायकलींपासून सुरुवात केली आणि आता मी सायकल चालवतो. मी बहुतेक रात्री उशिरा जेव्हा वाहतूक कमी असते तेव्हा, धोका कमी करण्यासाठी, मंद गतीने सायकल चालवतो, माझी गाडी माझ्या मागून येत असते.”

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!