महाराष्ट्र जागरण डेस्क: नववधूंवर सर्व ड्रेस खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात. परंतु सिल्क ड्रेस नववधूंचे सौंदर्य वाढवते. तुम्हाला सिल्क ड्रेसमध्ये असंख्य प्रकार आणि रंग मिळतील. सिल्क ड्रेसमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाइन्स सहजपणे उपलब्ध मिळतील. जसे की एम्ब्रॉयडरी, जरीकाम किंवा कलात्मक प्रिंट्स, जे वधूसाठी खास आणि राजेशाही लूक निर्माण करतात. या ड्रेससह भारी दागिने, आणि मेकअप केल्याने तुमचा लूक परिपूर्ण दिसेल. आज आपण जाणून घेऊयात कोणते सिल्क ड्रेस नववधूंसाठी परफेक्ट आहेत.
अनारकली सिल्क सूट ड्रेस पारंपरिक आणि शाही लूक देतात. गोटा पत्ती किंवा जरी वर्क असलेले अनारकली सूट लग्राच्या विधीसाठी उत्तम ठरतात. कांजीवरम किंवा बनारसी सिल्क ड्रेस अतिशय सुंदर दिसतात आणि दक्षिण भारतीय नववधूंसाठी हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये पारंपरिक सोनेरी बॉर्डर असते. जर तुम्हाला थोडा मॉडर्न लूक हवा असेल, तर पेस्टल रंगांतील शरारा सेट सिल्कमध्ये घालू शकता. हलकं वर्क आणि शाही दुपट्टा यामुळे हा लूक पूर्ण होईल.
सिल्क ड्रेसमध्ये पंजाबी स्टाईल सिल्क सूट नववधूंसाठी परफेक्ट आहे. यामध्ये तुम्हाला फुल वर्कचा दुपट्टा आणि जाड कढाई कुर्ता सहजपणे मिळेल. लाल आणि सोनेरी रंग हा नेहमीच नववधूसाठी खास पर्याय आहे. झरदोजी किंवा रेशीम कढाई असलेला हा सूट प्रत्येक कार्यक्रमात किंवा कोणत्याही खास प्रसंगी उठून दिसतो. तुम्ही तुमच्या आवडीचा ड्रेस कस्टमाइज देखील करू शकता. कस्टमाइज केल्याने तुमचा ड्रेस खूप सुंदर आणि आकर्षक दिसेल.


