Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Navi Mumbai Airport: आनंदाचा क्षण! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल

Navi Mumbai Airport: आनंदाचा क्षण! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल

Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून अधिकृतपणे व्यावसायिक विमान वाहतुकीला सुरुवात होत आहे. या पहिल्या व्यावसायिक उड्डाणाचा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी प्रवाशांचा प्रचंड उत्साह वाढला आहे. नोव्हेंबरपासूनच अनेकांनी पहिल्या प्रवासासाठी तिकीट आरक्षण करून ठेवल्याने पहाटे साडेसहा वाजल्यापासूनच विमानतळाच्या प्रवेशद्वारांवर गर्दी वाढू लागली. आज पहिल्याच दिवशी या विमानतळावरून 15 विमाने उड्डाण करतील.

दिवसभरात एकूण 30 ‘एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स’ होतील. या विमानतळाच्या सुरू होण्यामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांचा आणि विमानांचा अतिरिक्त ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत मिळणार आहे. लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिले यशस्वी विमान अवतरण झाले. इंडिगो एअरलाईन्सच्या 6E460 प्रकारच्या विमानाने रनवेवर सुरक्षित लँडिंग करत या भव्य प्रकल्पाच्या कार्यान्वयनाकडे ऐतिहासिक पाऊल टाकले आहे.

आकाशात एक भव्य ‘ड्रोन शो’ आयोजित

या ऐतिहासिक सोहळ्याची पूर्वसंध्या अत्यंत दिमाखदार साजरी करण्यात आली. विमानतळ कार्यान्वित होण्याच्या आनंदात बुधवारी रात्री 1,515 ड्रोन्सचा वापर करून आकाशात एक भव्य ‘ड्रोन शो’ आयोजित करण्यात आला होता. या ड्रोन शोच्या माध्यमातून विमानतळाच्या प्रवासाची झलक आकाशात साकारण्यात आली होती.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कल्पना सर्वप्रथम ‘सिडको’ने मांडली होती. त्यानंतर 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधानांच्या हस्ते या विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर आता हे विमानतळ प्रवाशांच्या सेवेत आजपासून सुरू झाले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!