Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अर्चनाच्या मुलांनी पहिल्या कमाईतून खरेदी केली ‘ही’ गोष्ट; आई-वडिल झाले भावूक…

अर्चनाच्या मुलांनी पहिल्या कमाईतून खरेदी केली ‘ही’ गोष्ट; आई-वडिल झाले भावूक…

मुंबई : अर्चना पूरण सिंग आणि तिचे पती परमीत सेठी सध्या चर्चेत आहे. कारण, अर्चना यांच्या मुलांची पहिली कमाई हाती आली. यातील विशेष बाब म्हणजे या पैशांतून या मुलांनी बिझनेस क्लासमधील तिकीटाची खरेदी केली. या गोष्टीमुळे अर्चना आणि परमीत हे दोघेही अत्यंत खूश झाले. त्यांनी मुलाचे कौतुकही केले.

अर्चना आणि त्यांच्या कुटुंबियांनी YouTube व्लॉगमध्ये, स्वित्झर्लंडच्या त्यांच्या सहलीची झलक शेअर केली. अर्चनाने आयुष्यात खूप ऐषोआराम अनुभवला असला तरी त्यांनी मुलांना त्यापासून दूर ठेवले. अर्चनाच्या मुलांनी पहिल्यांदाच बिझनेस क्लासमध्ये प्रवास केला. तिने व्लॉगमध्ये याचे कारण देखील स्पष्ट केले. अर्चना आणि परमीत १९९० च्या दशकापासून सुप्रसिद्ध अभिनेते आहेत आणि इतक्या वर्षांपासून इंडस्ट्रीत चांगले काम करत आहेत. त्यांच्या मुलांसाठी त्यांचा एक कडक नियम होता, ते त्यांच्या पालकांसोबत स्वतःची तिकिटे खरेदी करण्याइतके मोठे होईपर्यंत बिझनेस क्लासमध्ये प्रवास करणार नाहीत.

स्वित्झर्लंडची ही सहल त्यांच्या मुलांनी बिझनेस क्लासमध्ये प्रवास करण्याची पहिलीच वेळ होती. व्हिडिओमध्ये अर्चनाचा मुलगा आयुष्मानने खुलासा केला की तो आणि आर्यमन पहिल्यांदाच बिझनेस क्लासमध्ये प्रवास करत आहेत. कारण, ही त्यांच्या आयुष्यातील पहिली कमाई आहे. यातूनच त्यांनी विमानातून प्रवास केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!