Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

TMC Election: ठाण्यात सत्ता शिंदेसेनेच्या हाती जाणार! 29 जागांवर आघाडी; भाजपाची भक्कम साथ, 15 जागांवर विजयी

TMC Election: ठाण्यात सत्ता शिंदेसेनेच्या हाती जाणार! 29 जागांवर आघाडी; भाजपाची भक्कम साथ, 15 जागांवर विजयी

TMC Election Result: महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीचा भाग म्हणून १५ जानेवारी २०२६ रोजी महानगरपालिकेच्या सर्व वॉर्डांमध्ये मतदान पार पडले आहे. यानंतर ठाणे महानगरपालिका (टीएमसी) निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी १० वाजल्यापासून सुरू झाली आहे. गेल्या ३० वर्षांपासून ठाणे महानगरपालिकेत शिवसेना सत्तेत आहे. दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या काळापासून ठाणे महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. यावेळीही एकनाश शिंदेंनी हा गड राखल्याचे पाहायला मिळत आहे.

१९८७ ते १९९३ पर्यंतच ठाणे महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाची सत्ता होती. या कालावधीचा अपवाद वगळता, ठाणे महानगरपालिका आणि शिवसेनेचे अतूट नाते राहिले आहे. २०२६ च्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने ठाण्यात आपले खाते उघडले. प्रभाग १० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नजीब मुल्ला, पूनम माळी, वहिदा खान आणि सुहास देसाई यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. नजीब मुल्ला हे प्रदेश सरचिटणीस आणि जिल्हाध्यक्ष आहेत.

२०२६ च्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा शिंदे गट दणदणीत विजय मिळविण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटातील वनिता घोगरे, सरिता ठाकूर, प्रशांत जाधव आणि हनुमंत जगदाळे यांनी प्रभाग क्रमांक ६ जिंकला आहे. या प्रभागात सर्व विरोधी शिवसेना (ठाकरे गट) उमेदवारांचा पराभव झाला.

ठाणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप मोठ्या विजयासाठी सज्ज आहे. शिवसेनेच्या शिंदे गटानेही दणदणीत विजय मिळवला. ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजपच्या स्नेहा आंब्रे आणि मुकेश मोकाशी आणि शिंदे सेनेच्या आशा शेर बहादूर सिंग आणि सिद्धार्थ पांडे यांनी विजय मिळवला.

ठाण्यात एकनाथ शिंदेंची शिवसेना २४ जागांवर आघाडीवर आहे. भाजप ५ जागांवर आघाडीवर आहे. तर शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष ४ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसही ४ जागांवर आघाडीवर आहे. यामुळे ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!