Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Indapur: इंदापूरच्या विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात ‘विश्वास’ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

Indapur: इंदापूरच्या विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात ‘विश्वास’ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

इंदापूर : इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय (कला, वाणिज्य व विज्ञान) कळंब-वालचंदनगर, ता. इंदापूर,जि.पुणे या ठिकाणी इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान वर्धापन दिन स्थापनेच्या निमित्ताने दि.३० जानेवारी २०२६ रोजी ‘विश्वास’आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

स्पर्धेचे आकर्षक विषय

या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी चालू घडामोडी आणि सामाजिक प्रश्नांवर आधारित खालील विषय निवडण्यात आले आहेत:

  • कीर्तनपरंपरा: बदलते स्वरूप
  • ए.आय. (AI): आजचे युग
  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण: प्रभाव आणि परिणाम
  • लोकशाही: लोकांची सत्ता की सत्ताधाऱ्यांचा खेळ?
  • आर्थिक महासत्ता: सत्य की स्वप्न
  • आजच्या युवकांसमोरील आव्हाने

हेही वाचा – Indapur Election: ZP निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूरमध्ये राजकीय हालचालींना वेग; शेळगाव-निमसाखर गणामध्ये भाजप कडून सत्यजीत रणवरे इच्छुक

भरघोस बक्षिसे आणि सन्मान

स्पर्धेतील गुणवंत वक्त्यांसाठी रोख रक्कम आणि प्रमाणपत्र स्वरूपात बक्षिसे दिली जाणार आहेत:

  • प्रथम क्रमांक: रु. १०,००० रोख व प्रमाणपत्र
  • द्वितीय क्रमांक: रु. ७,००० रोख व प्रमाणपत्र
  • तृतीय क्रमांक: रु. ५,००० रोख व प्रमाणपत्र

स्पर्धेमध्ये जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक काळंगे व समन्वयक प्रा.डॉ.विजय केसकर यांच्याकडून करण्यात येत आहे.स्पर्धेत सहभागी होवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ७०२०८९६४७५,८४११९३७१२० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!