इंदापूर : इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय (कला, वाणिज्य व विज्ञान) कळंब-वालचंदनगर, ता. इंदापूर,जि.पुणे या ठिकाणी इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान वर्धापन दिन स्थापनेच्या निमित्ताने दि.३० जानेवारी २०२६ रोजी ‘विश्वास’आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
स्पर्धेचे आकर्षक विषय
या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी चालू घडामोडी आणि सामाजिक प्रश्नांवर आधारित खालील विषय निवडण्यात आले आहेत:
- कीर्तनपरंपरा: बदलते स्वरूप
- ए.आय. (AI): आजचे युग
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण: प्रभाव आणि परिणाम
- लोकशाही: लोकांची सत्ता की सत्ताधाऱ्यांचा खेळ?
- आर्थिक महासत्ता: सत्य की स्वप्न
- आजच्या युवकांसमोरील आव्हाने
भरघोस बक्षिसे आणि सन्मान
स्पर्धेतील गुणवंत वक्त्यांसाठी रोख रक्कम आणि प्रमाणपत्र स्वरूपात बक्षिसे दिली जाणार आहेत:
- प्रथम क्रमांक: रु. १०,००० रोख व प्रमाणपत्र
- द्वितीय क्रमांक: रु. ७,००० रोख व प्रमाणपत्र
- तृतीय क्रमांक: रु. ५,००० रोख व प्रमाणपत्र
स्पर्धेमध्ये जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक काळंगे व समन्वयक प्रा.डॉ.विजय केसकर यांच्याकडून करण्यात येत आहे.स्पर्धेत सहभागी होवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ७०२०८९६४७५,८४११९३७१२० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.


