Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Deepinder Goyal Resigns: झोमॅटोच्या ‘इटरनल ग्रुप’मध्ये मोठी खांदेपालट! दीपिंदर गोयल यांचा CEO पदाचा राजीनामा, आता करणार ‘हे’ काम

Deepinder Goyal Resigns: झोमॅटोच्या ‘इटरनल ग्रुप’मध्ये मोठी खांदेपालट! दीपिंदर गोयल यांचा CEO पदाचा राजीनामा, आता करणार ‘हे’ काम

Deepinder Goyal Resigns : कॉर्पोरेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. झोमॅटोची (Zomato) मुख्य कंपनी असलेल्या ‘इटरनल ग्रुप’चे (Eternal Group) संस्थापक दीपिंदर गोयल यांनी ग्रुप सीईओ पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ते कंपनीपासून दूर जाणार नसून भविष्यात बोर्डाचे ‘व्हाईस चेअरमन’ म्हणून काम पाहतील. अलबिंदर ढींडसा आता इटरनल ग्रुपचे नवीन ग्रुप सीईओ म्हणून धुरा सांभाळणार आहेत.

राजीनामा का दिला? काय आहे दीपिंदर गोयल यांचा प्लॅन?

स्वतः गोयल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करून या बदलाची कारणे स्पष्ट केली आहेत. गोयल यांना काही अशा व्यवसायांवर आणि कल्पनांवर काम करायचे आहे ज्यामध्ये जोखीम जास्त आहे. एका सार्वजनिक कंपनीच्या (Public Listed Company) सीईओ पदावर राहून असे धाडसी प्रयोग करणे तांत्रिकदृष्ट्या कठीण असते. सीईओ पदावर असलेल्या कायदेशीर आणि प्रशासकीय चौकटीमुळे त्यांची एकाग्रता विभागली जात होती. कंपनीमध्ये शिस्त आणि लक्ष केंद्रित राहण्यासाठी त्यांनी ही जबाबदारी सोपवली आहे. सीईओ पद सोडले तरी ते धोरणात्मक निर्णय, कंपनी संस्कृती आणि नेतृत्व विकासामध्ये सक्रिय राहतील.

अलबिंदर ढींडसांवर विश्वास; ‘बॅटल-हार्डन’ फाऊंडरकडे सूत्रे

नवीन सीईओ अलबिंदर ढींडसा यांच्याबद्दल बोलताना गोयल म्हणाले की, “ब्लिंकिटच्या (Blinkit) यशामध्ये अलबिंदर यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी पुरवठा साखळी आणि कार्यप्रणाली अत्यंत मजबूत केली आहे.” ढींडसा यांच्या अंमलबजावणी क्षमतेमुळेच कंपनी आज ‘ब्रेकईवन’पर्यंत पोहोचू शकली, असेही त्यांनी नमूद केले.

१८ वर्षांचा प्रवास आणि भविष्यातील स्वप्न

दीपिंदर गोयल यांनी आपल्या आयुष्यातील निम्मी वर्षे म्हणजे १८ वर्षे ही कंपनी उभारण्यासाठी दिली आहेत. एका साध्या ‘मेन्यू स्कॅनिंग’ स्टार्टअपपासून सुरू झालेला हा प्रवास आज अब्जावधींच्या साम्राज्यापर्यंत पोहोचला आहे. “इटरनलला भारताची सर्वात मौल्यवान कंपनी बनवणे आणि एक अब्ज ग्राहकांपर्यंत पोहोचणे हेच माझे स्वप्न आहे,” असे भावूक उद्गार त्यांनी शेवटी काढले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!