Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bharat Gogawale: ‘अनावधानाने नाव येतंच कसं?’ प्रफुल पटेलांच्या मुद्द्यावरून भरत गोगावलेंचा तटकरेंना सवाल

Bharat Gogawale: ‘अनावधानाने नाव येतंच कसं?’ प्रफुल पटेलांच्या मुद्द्यावरून भरत गोगावलेंचा तटकरेंना सवाल

Bharat Gogawale: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रिक्त झालेल्या ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ पदावरून महायुतीमध्ये जुंपली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रफुल पटेल यांचे नाव अध्यक्ष म्हणून घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरून शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “प्रफुल पटेलांचे नाव अनावधानाने आले, असे म्हणणे हा निव्वळ बनाव आहे. पडद्यामागे सूत्रे आधीच हाललेली असतात, तेव्हाच अशी नावे बाहेर येतात,” अशा शब्दांत गोगावलेंनी तटकरेंच्या स्पष्टीकरणाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.

‘मराठी चेहरा’ विरुद्ध ‘प्रफुल पटेल
प्रफुल पटेल यांच्या संभाव्य नियुक्तीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘राष्ट्रवादीचा अध्यक्ष पटेल नसावा तर पाटील असावा’ अशी रोखठोक भूमिका मांडली होती. या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी पियुष गोयल यांच्या विधानाला ‘चूक’ ठरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरत गोगावले यांनी यावर सडकून टीका करताना म्हटले की, अजित दादांच्या निधनाला अजून १२ दिवसही उलटले नाहीत, तोवर ही मंडळी पदांच्या वाटण्या आणि नावांच्या घोषणांमध्ये मग्न आहेत. यातून त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या घाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – Praful Patel : प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष? भाजप नेत्याच्या वक्तव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

दरम्यान, सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील परंपरागत राजकीय वैर आता जिल्हा स्तरावरून राज्य स्तरावर आले आहे. निमित्त जरी अध्यक्षपदाचे असले, तरी मूळ संघर्ष रायगडच्या वर्चस्वाचा असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आज इंदापूर येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी सुनील तटकरे यांची जाहीर सभा होत आहे. अजित दादांच्या निधनानंतरची ही त्यांची पहिलीच राजकीय सभा असल्याने, ते गोगावलेंच्या या विधानावर काय पलटवार करतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!