Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Supriya Sule: ‘अजितदादांसोबत विलिनीकरणावर चर्चा झाली होती, पण आता…’; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

Supriya Sule: ‘अजितदादांसोबत विलिनीकरणावर चर्चा झाली होती, पण आता…’; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिल्लीत माध्यमांशी बोलताना राजकीय गौप्यस्फोटांसोबतच आपल्या कौटुंबिक आयुष्यातील एक महत्त्वाची बातमी शेअर केली. आपल्या मुलीचे लग्न जमल्याची माहिती देताना त्यांना दिवंगत बंधू अजित पवार यांची प्रकर्षाने आठवण झाली. “आज दादा असता, तर त्यानेच ही आनंदवार्ता सर्वांना सांगितली असती,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

विलीनीकरणाचे गुपित आणि दादांशी झालेली चर्चा
दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या एकत्र येण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. यावर पडदा उचलताना सुळे म्हणाल्या, “विलीनीकरणाच्या मुद्द्यावर माझ्या आणि अजितदादांमध्ये सविस्तर संवाद झाला होता. आमच्यात नेमकी काय चर्चा झाली, हे दादांना माहित होतं. मी यावर बोललेले अनेकांना आवडत नसले, तरी ते नाकारता न येणारे वास्तव आहे.”

हेही वाचा – सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक; 1037 कोटींच्या विकास आराखड्यावर चर्चा

पालकमंत्रीपदी सुनेत्रा पवार
दरम्यान, पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांच्या झालेल्या नियुक्तीवर सुप्रिया सुळे यांनी अत्यंत संवेदनशील प्रतिक्रिया दिली. “सुनेत्रा वहिनींनी ही जबाबदारी स्वीकारल्याचा मला अभिमान आणि आनंद आहे. मात्र, हे सर्व पाहण्यासाठी दादा आज आपल्यात नाहीत, याचे शल्यही मोठे आहे. माझी स्थिती सध्या ‘एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात आनंद’ अशी आहे,” असे त्या म्हणाल्या.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!