Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune: चिमुकलीचा हात लिफ्टमध्ये अडकला; बचावासाठी सगळ्यांची धावपळ, थरारक व्हिडीओ समोर

Pune: चिमुकलीचा हात लिफ्टमध्ये अडकला; बचावासाठी सगळ्यांची धावपळ, थरारक व्हिडीओ समोर

Pune: पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरात एका गृहनिर्माण सोसायटीत लिफ्टच्या दरवाजाच्या कोपऱ्यात चिमुकलीचा हात अडकल्याची थरारक घटना घडली. घटनेवेळी त्या चिमुकलीची आई ही तिच्या सोबत होती. इतर काही लोक ही त्या लिफ्टमध्ये होते. मात्र, त्यांच मीलूवर लक्ष नव्हतं. तिचा हात सापडला त्यावेळी एकच धावपळ उडाली. ही सर्व दृष्य सीसीटीव्हीत कैद झाली. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिघीतील एका सोसायटीतील घटना

हात अकडकल्यानंतर तिचा हात काढण्याचा प्रयत्न तिथे असलेल्या लोकांनी केला. सुदैवाने काही मिनिटांच्या प्रयत्नांनंतर हात सुरक्षित बाहेर काढण्यात आला. दिघीतील एका सोसायटीत ही घटना घडली. एक महिला आपल्या काही महिन्यांच्या चिमुकलीसह लिफ्टमधून जात होती. लिफ्ट इच्छित मजल्यावर थांबल्यानंतर दरवाजा उघडला. त्यानंतर तो पुन्हा बंद होऊ लागला. यावेळी चिमुकलीचा हात त्या दरवाजावर होता. त्याच वेळी दरवाजा बंद होताना त्या चिमुकलीचा हात लिफ्टच्या कोपऱ्यात अडकला.

चिमुकलीला असह्य वेदना

हा प्रकार लक्षात येताच लिफ्टमधील महिलेसह उपस्थित नागरिक भयभीत झाले. चिमुकली वेदनेने रडत असतानाच तिला वाचवण्यासाठी तात्काळ प्रयत्न सुरू झाले. काही मिनिटांच्या धडपडीनंतर तिचा हात बाहेर काढण्यात आला. मोठा अनर्थ टळला. या घटनेचा सर्व प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे लिफ्ट वापरताना विशेषतः लहान मुलांबाबत कमालीची सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा – Pune Lift Collapses: पुण्यात वाघोलीतील अर्बनो सोसायटीत लिफ्ट कोसळली; 6 जण जखमी, रहिवाशांकडून बिल्डरविरोधात तक्रार

या आधी ही अशा घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे लहान मुलांना लिफ्टमध्ये नेताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. नाही तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेनं पुन्हा एकदा ही बाब अधोरेखीत केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सर्व सोसायटीमध्ये व्हायरल होत आहे. शिवाय इमारतीत राहाणाऱ्या नागरिकांना विशेष आवाहन ही करण्यात येत आहे. त्यात काळजी घेण्याची सुचना करण्यात आली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!