Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलते ठरली ‘बिग बॉस मराठी ६’ची विजेती; रितेश देशमुखकडून खास भेट

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलते ठरली ‘बिग बॉस मराठी ६’ची विजेती; रितेश देशमुखकडून खास भेट

Bigg Boss Marathi 6 Winner : ‘बिग बॉस मराठी ६’ चा ग्रँड फिनाले मोठ्या थाटामाटात पार पडला असून तन्वी कोलते हिने विजेतेपद पटकावले आहे. तर राकेश बापट उपविजेता ठरला. या स्पर्धेतील टॉप ५ मध्ये विशाल कोटियन, राकेश बापट, अनुश्री माने, दीपाली सय्यद आणि तन्वी कोलते यांचा समावेश होता. विजयानंतर तन्वीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

विजेती ठरलेल्या तन्वी कोलतेला ट्रॉफीसह तब्बल १५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. याशिवाय पु.ना.गाडगीळकडून १० लाखांचे व्हाउचर आणि तुनवाल ई-मोटर्सकडून ई-बाईकही देण्यात आली. बिग बॉसच्या घरात ‘टास्क क्वीन’ म्हणून ओळख मिळवलेल्या तन्वीवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या शोचे होस्ट रितेश देशमुख यांनी तन्वीला खास भेट देत तिचा गौरव केला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेली फ्रेम भेट म्हणून दिली. ही भेट पाहून तन्वी भावुक झाली. दरम्यान, रितेश देशमुख यांचा ‘राजा शिवाजी’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट २ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

विजयानंतर प्रतिक्रिया देताना तन्वी म्हणाली की, “१०० दिवसांच्या प्रवासानंतर ही ट्रॉफी माझ्या हातात आली आहे. बिग बॉस जिंकण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले. मी या मंचावर स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आले होते आणि आज ‘तन्वी कोलते’ हा ब्रँड बनून बाहेर पडत आहे.”

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!