पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, टाटा मेमोरियल सेंटर येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई येथे वैद्यकीय समाजसेवक (ब्लड सेंटर) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. सदर मुलाखत ही बोर्ड रूम, दुसरा मजला, गोल्डन ज्युबिली इमारत, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. अर्नेस्ट बोर्जेस रोड, परळ, मुंबई – ४०००१२ येथे घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 35000 रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.
यामध्ये आता अर्ज करावा लागणार आहे. मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार असून, ही मुलाखत ५ मे २०२६ रोजी घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://tmc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


