Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर दणदणीत घोडदौड; रितेश देशमुखांनी पहिल्याच विकेंडला रचला नवा इतिहास

‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर दणदणीत घोडदौड; रितेश देशमुखांनी पहिल्याच विकेंडला रचला नवा इतिहास

Riteish-Raja Shivaji Collection : रितेश देशमुख दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच विकेंडमध्ये दमदार कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला आहे. मराठीसोबतच हिंदी भाषेतही प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, फरदीन खान, भाग्यश्री, सचिन खेडेकर, अमोल गुप्ते आणि जितेंद्र जोशी यांसारखी दमदार स्टारकास्ट झळकत आहे.

रविवारीही कमाईचा धडाका

Sacnilk च्या अहवालानुसार, ‘राजा शिवाजी’ने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी तब्बल १२ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले. तब्बल ५,७७१ शोजमधून ही कमाई झाली असून मराठी आवृत्तीने ७.७५ कोटी रुपये, तर हिंदी आवृत्तीने ४.२५ कोटी रुपये कमावले.

यासह चित्रपटाचे भारतातील एकूण नेट कलेक्शन ३३.९० कोटी रुपये, तर ग्रॉस कलेक्शन ४०.३४ कोटी रुपये इतके झाले आहे. पहिल्याच तीन दिवसांत ४० कोटींचा टप्पा पार करत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड सिद्ध केली आहे.

‘लय भारी’, ‘सैराट’ आणि ‘वेड’लाही टाकलं मागे

‘राजा शिवाजी’ने पहिल्या दिवशी १३.५१ कोटी रुपयांची कमाई करत मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात मोठी ओपनिंग नोंदवली. यानंतर पहिल्या तीन दिवसांत ३३.९० कोटींची कमाई करत या चित्रपटाने ‘सैराट’ आणि ‘वेड’सारख्या सुपरहिट चित्रपटांचे विक्रम मोडले.

विशेष म्हणजे, २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ या चित्रपटाची सुमारे ४० कोटी रुपयांची लाइफटाइम कमाईही ‘राजा शिवाजी’ने अवघ्या पहिल्या विकेंडमध्येच ओलांडली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा एक ऐतिहासिक क्षण मानला जात असून, येत्या काही दिवसांत हा चित्रपट आणखी नवे विक्रम प्रस्थापित करेल, अशी चर्चा रंगली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!