Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bacchu Kadu : …तर मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदेंना जास्त पसंती मिळेल; बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य

Bacchu Kadu : …तर मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदेंना जास्त पसंती मिळेल; बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य

Bacchu Kadu : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मुख्यमंत्रीपदाबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनेचे विधान परिषद सदस्य बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी आले असताना माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, “आज जर महाराष्ट्रात सर्व्हे केला, तर मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांनाच सर्वाधिक पसंती मिळेल. ते नेहमीच सर्वसामान्य जनतेशी जोडलेले आहेत, त्यामुळे मलाच नाही तर अनेकांना ते मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते.” त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

दरम्यान, राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईवरही बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी या कारवाईचा निषेध करत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी केली. तसेच आपण राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांच्या भूमिकेला समर्थन देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर बोलताना बच्चू कडू यांनी सांगितले की, “आपण आता कोणत्याही जातीपातीच्या आंदोलनात सहभागी होणार नाही. शेतकरी आणि दिव्यांग हे सर्व समाजात असल्याने व्यापक दृष्टीकोनातूनच आपण पुढे काम करणार आहोत.”

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!