पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, धुळे महानगरपालिकेत रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
धुळे महानगरपालिकेत सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला धुळे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत १२ रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.dhulecorporation.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 12 पदे.
– नोकरीचे ठिकाण : धुळे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.
– अर्ज शुल्क : रु. १०००/- (ऑनलाईन स्वरुपात)
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : ५ जून २०२६.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : १५ जून २०२६ सकाळी ११:०० वाजता.
– मुलाखतीचा पत्ता : अटल बिहारी वाजपेयी सभागृह, नविन प्रशासकीय इमारत, धुळे महानगरपालिका


