महाराष्ट्र जागरण डेस्क: झी टीव्हीवरील ‘जागृति – एक नयी सुबह’ या मालिकेतील भावनिक प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता. अखेर जागृति (रचना मिस्त्री) आणि सुरज (विजयेन्द्र कुमेरिया) यांनी एकमेकांवरील प्रेमाच्या भावना स्वीकारल्या असून, ते लग्न करण्याचा निर्णय घेतात. या प्रसंगाला खऱ्या अर्थाने उठाव देणारा भाग म्हणजे रचना मिस्त्रीचा अप्रतिम नववधू लूक ! गडद लाल रंगाच्या राजेशाही लेहेंग्यावर सूक्ष्म सोन्याच्या भरजरी नक्षीकामाने सजावट केलेली होती, यात रचना अत्यंत देखण्या आणि तेजस्वी नववधूसारखी भासली.
याबद्दल रचना मिस्त्री म्हणाली, आधीही मी ऑनस्क्रीन नववधूचा पोशाख घातला आहे, पण जागृतिच्या रूपात हा लूक खूप वेगळा, अधिक भावनिक, अधिक वाटला. हा गडद लाल लेहेंगा आणि त्यावरील बारकाईने केलेली नक्षी इतकी सुंदर होती की, खरंच मी स्वतःला एक खऱ्या अर्थाने दुल्हन असल्यासारखी वाटत होते. खरं सांगायचं तर, जेव्हा मी प्रत्यक्षात लग्न करेन, तेव्हा अशाच प्रकारचं बारकाव्यांनी भरलेलं नववधू रूप मला हवे आहे. तो स्टेटमेंट चोकर, पारंपरिक झुमके, मांगटिक्का आणि नथ, मेहंदी लावलेले हात आणि नववधूच्या चेहऱ्यावरचं ते खास तेज हे सगळं खूपच जादुई वाटलं.


