Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी घटस्फोटांच्या चर्चांना दिला पूर्णविराम; अनेक सिक्रेट्स केली ‘ओपन’

गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी घटस्फोटांच्या चर्चांना दिला पूर्णविराम; अनेक सिक्रेट्स केली ‘ओपन’

मुंबई : अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांचीच चर्चा सध्या सुरु आहे. त्यातच आता सुनीता आहुजा या ‘पती, पत्नी और पंगा’ या शोमध्ये गेल्या होत्या. या शोमध्ये त्यांनी अनेक मजेदार किस्से सांगितले. या दरम्यान टीव्ही अभिनेता अभिषेक कुमारने गोविंदा यांची पत्नी सुनीता आहुजा यांना काही प्रश्नही विचारले आहे. आता याच शोची सध्या चर्चा सुरु आहे.

सुनीता आहुजा यांनी पुन्हा एकदा गोविंदासोबतच्या नात्याबाबत सांगितले. या टीव्ही शोच्या अलीकडच्या भागात गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांना खास पाहुणी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. बोल्ड स्टाईलसाठी ओळखल्या जाणाऱ्या सुनीता शोमध्ये आल्या तेव्हा वातावरण बदलल्याचे पाहिले मिळाले. पण टीव्ही अभिनेता अभिषेक कुमार यांनी सर्वात जास्त लक्ष वेधले, जेव्हा त्यांनी कॅमेऱ्यासमोर सुनीता यांना प्रपोज केले. एपिसोडमध्ये असे दाखवण्यात आले होते की अभिषेक प्रथम सुनीताचे कौतुक करतो आणि नंतर अचानक प्रपोज करताना दिसला.

अभिषेकच्या बोलण्याने तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित होतात. सुनीता आहुजा त्यांच्या अद्भुत विनोदबुद्धीसाठी देखील ओळखली जाते. अभिषेकच्या प्रपोजलवर सुनीता हसल्या. नंतर अभिषेक कुमारने स्वतः शोमध्ये त्यांच्या आणि गोविंदाच्या घटस्फोटाच्या बातमीवर प्रश्न विचारला. त्यावर सुनीता यांनी म्हटले की, या वयात जेव्हा आपल्याला आपल्या मुलांचे लग्न करायचे असते, तेव्हा मुलगा यशच्या करिअरबद्दल विचार करा, मग आम्ही हे सर्व कसे करू’, असे म्हणत घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!