पुणे : नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, आघारकर संशोधन संस्था येथे एका रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
आघारकर संशोधन संस्था, पुणे येथे सहाय्यक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑक्टोबर २०२५ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://aripune.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
⇒ पदाचे नाव : प्रकल्प सहाय्यक
⇒ एकूण रिक्त पद : 01 पद.
⇒ नोकरीचे ठिकाण : पुणे.
⇒ वेतन / मानधन : दरमहा रु. 20,000/- + HRA.
⇒ वयोमर्यादा : 50 वर्षांपर्यंत.
⇒ अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ ऑक्टोबर २०२५.


