बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरूच्या बाहेरील तालेकेरे येथे एक कंटेनर अचानक पलटी झाल्याची घटना शनिवारी घडली. या अपघातात ६ जण ठार झाले आहेत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. कंटेनर उलटल्यामुळे राष्ट्रीय राज्य महामार्ग क्रमांक – ४८ वर वाहतुकीची मोठी कोंडी झाली.
या घटनेचे वृत्त कळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतुकीची कोंडी दूर केली व पंचनामा करीत ६ जणांचे मृतदेह ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत अधिक तपास सुरू केला आहे.


