Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sarasbaug Mahalaxmi Temple: सारसबाग मंदिरातील महालक्ष्मी देवीला 16 किलो सोन्याची साडी

Sarasbaug Mahalaxmi Temple: सारसबाग मंदिरातील महालक्ष्मी देवीला 16 किलो सोन्याची साडी

Sarasbaug Mahalaxmi Temple: पुणे शहरातील सारसबाग परिसरातील श्री महालक्ष्मी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्याच्या दिवशी श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात आली. तब्बल 16 किलो वजनाची ही साडी दक्षिण भारतातील कारागिरांनी सहा महिन्यांच्या मेहनतीनंतर साकारली असून, तिच्यावर नाजूक नक्षीकाम केलेले आहे. श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टच्या माध्यमातून ही परंपरा दरवर्षी जपली जाते.

देवीला ही सोन्याची साडी दरवर्षी दोनदा – दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नेसवली जाते. भक्तांनी अर्पण केलेली ही साडी मंदिर प्रशासनाच्या देखरेखीखाली देवीला परिधान केली जाते. इतिहासातील परंपरेनुसार, दसऱ्याच्या दिवशी सोन्याचे महत्त्व विशेष मानले जाते. प्राचीन काळात या दिवशी सोने लुटण्याची परंपरा होती. त्याचेच स्मरण म्हणून श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी नेसवली जाते, अशी माहिती मंदिर विश्वस्तांनी दिली.

हेही वाचा – Dasara Melava: दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार? राजकीय चर्चांना उधाण

दरम्यान, साडीतील आकर्षक नक्षीकाम आणि चमकदार सुवर्णधाग्यांमुळे देवीचे रुप अधिकच मनमोहक दिसत आहे. सोन्याच्या साडीत सजलेली श्री महालक्ष्मी देवीची झलक पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. ही सोन्याची साडी एका भक्ताने देवीला अर्पण केली आहे. तब्बल 16 किलो वजनाच्या या साडीला साकारण्यासाठी सुमारे सहा महिने लागले.

हेही वाचा – येताना चणा डाळ, गुळ, गव्हाचे पीठ घेऊन या; दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंची समर्थकांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साद

साडीच्या निर्मितीसाठी विशेष कौशल्य असलेल्या दक्षिण भारतीय कारागिरांची मदत घेण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही देवीचे सुवर्णवस्त्रातील दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात उत्सवी वातावरण पाहायला मिळाले. दिवसभर देवीच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. श्रद्धा, भक्ती आणि सोनेरी सजावटीची ही सांगड पुणेकरांसाठी आकर्षणाचा विषय ठरली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!