Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

CNG Price Hike: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! CNG च्या दरात वाढ इतक्या रुपयांची वाढ

CNG Price Hike: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! CNG च्या दरात वाढ इतक्या रुपयांची वाढ

CNG Price Hike: महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल)ने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी)च्या किमतींमध्ये वाढ केली आहे. 1 ऑक्टोबर 2025 च्या मध्यरात्रीपासून दर प्रति किलो 1 रुपयांनी वाढवण्यात आला असून, नवीन दर 90.75 रुपये प्रति किलो इतका लागू झाला आहे.

एमएनजीएलच्या निवेदनानुसार, सीएनजी विभागासाठी लागणाऱ्या नैसर्गिक वायूच्या इनपुट खर्चात वाढ झाल्याने ही दरवाढ अपरिहार्य ठरली आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ही वाढ किरकोळ असली तरीही सीएनजी हे इतर इंधनांच्या तुलनेत अजूनही किफायतशीर पर्याय ठरते. एमएनजीएलने सांगितले की, वाढीनंतरही सीएनजीचा वापर पेट्रोलच्या तुलनेत सुमारे 47 टक्के, डिझेलच्या तुलनेत 24 टक्के आणि ऑटोरिक्षा चालकांसाठी सुमारे 25 टक्के बचत देतो. त्यामुळे वाहनचालकांना इंधनखर्चात मोठा फरक जाणवतो.

हेही वाचा – PMC Election: मोठी बातमी! पुणे महापालिका निवडणुकीच्या अंतिम प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाची मान्यता

दरम्यान, एमएनजीएलने स्पष्ट केले आहे की घरगुती पाईपद्वारे पुरवला जाणारा नैसर्गिक वायू (पीएनजी) याच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे घरगुती ग्राहकांना याचा फटका बसणार नाही. दरवाढीमुळे खासगी वाहनधारक, टॅक्सी आणि ऑटोरिक्षा चालकांमध्ये नाराजी व्यक्त होत असली, तरी कंपनीच्या मते दरवाढ आवश्यक होती. एमएनजीएलने नागरिकांना पर्यावरणपूरक आणि स्वस्त इंधन म्हणून सीएनजीचा वापर सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!