Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Babu Chhetri: मोठी बातमी! ‘झुंड’ चित्रपटातील कलाकार प्रियांशू क्षत्रियची हत्या

Babu Chhetri: मोठी बातमी! ‘झुंड’ चित्रपटातील कलाकार प्रियांशू क्षत्रियची हत्या

Priyanshu Kshatriya Murder: नागपूरमध्ये ‘झुंड’ चित्रपटात अभिनय केलेल्या प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्रीच्या हत्येने चित्रपटसृष्टी हादरली आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत पडद्यावर झळकलेल्या या अभिनेत्याचा दुर्दैवी शेवट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जरीपटका परिसरात प्रियांशूचा त्याचा मित्र ध्रुव साहू याच्यासोबत वाद झाला. दारूच्या नशेत झालेल्या या वादात ध्रुवने रागाच्या भरात धारदार शस्त्राने वार करत प्रियांशूला गंभीर जखमी केले. त्यानंतर त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपी ध्रुव साहूला अटक केली आहे.

दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले तेव्हा बाबू छत्री अर्धनग्न अवस्थेत प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेला आढळला. स्थानिकांना आरडाओरडा ऐकू आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. प्राथमिक चौकशीत बाबू छत्रीवर यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.‘झुंड’ चित्रपटातील त्याच्या नैसर्गिक अभिनयाने तो प्रेक्षकांच्या लक्षात राहिला होता. नागराज मंजुळे यांनी नागपूरमधील स्थानिक तरुणांना घेऊन हा चित्रपट साकारला होता. त्यावेळी बाबूची निवड झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले होते.

हेही वाचा – Chandrapur: चंद्रपूर हादरले! जमीन फसवणुकीच्या वादातून शेतकऱ्याची तहसील कार्यालयात आत्महत्या; खासदार धानोरकरांवर कुटुंबीयांचा गंभीर आरोप

तथापी, एका मुलाखतीत बाबू छत्रीने सांगितले होते की, तो रेल्वे ट्रॅकजवळच्या वस्तीत वाढला. लहानपणी तो कोळसा गोळा करून विकायचा. त्याच्या नैसर्गिक बोलण्यात आणि व्यक्तिमत्त्वात काहीतरी वेगळं पाहून नागराज मंजुळे यांनी त्याला संधी दिली होती. या घटनेने ‘झुंड’ चित्रपटातील सहकलाकार आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. नागपूर पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, हत्येचं नेमकं कारण काय हे समजण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!