मुंबई : काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोमवार, २३ डिसेंबर रोजी परभणी दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात गांधी, परभणीतील पोलीस कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते स्व. विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.
दुपारी १२.३० वाजता गांधी यांचे विशेष विमानाने नांदेड येथे आगमन होणार आहे. त्यानंतर ते नांदेडहून परभणीला जातील. दुपारी २.१५ ते ३.१५ या वेळेत ते सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. यावेळी काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ. विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, खा. रवींद्र चव्हाण, कल्याण काळे यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.


