Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

विखार पसरवणाऱ्या विखेंना सोडणार नाही; छगन भुजबळ यांचा इशारा

विखार पसरवणाऱ्या विखेंना सोडणार नाही; छगन भुजबळ यांचा इशारा

बीड: बीडच्या महाएल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर जोरदार टीका करत ‘विखे आला आणि महाराष्ट्रभर विखार पसरवून गेला’ असा हल्ला चढवला होता. यावर आता स्वतः विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले असून, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाचा प्रश्न सोडवला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

भुजबळांनी विखेंवर मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनात अनावश्यक हस्तक्षेप केल्याचा आरोप केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना विखे म्हणाले, मी नेहमीच भुजबळांचा आदर करत आलो आहे. सार्वजनिक जीवनात कधीच ओबीसी आणि मराठा समाजात दरी वाटली नाही. आज महाराष्ट्रातील लोक एकत्र दिवाळी साजरी करत आहेत. ओबीसी दिवाळी आणि मराठा दिवाळी असं कधी झालंय का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – ‘विजय वडेट्टीवार छगन भुजबळांच्या आहारी गेलेत…’; मनोज जरांगेंचा पुन्हा वडेट्टीवारांवर निशाणा

विखे पाटील यांनी पुढे सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की, आमच्या डीएनएमध्येच ओबीसी आहे. कायद्याच्या चौकटीत बसवून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला आहे. मी लवकरच भुजबळांना भेटणार आहे आणि त्यांच्या मनातील गैरसमज दूर करणार आहे. न्यायमूर्ती शिंदे यांच्यासह भेट घेऊन संपूर्ण प्रक्रिया त्यांना समजावून सांगू.

दरम्यान, विखे पाटलांनी शरद पवारांवरही निशाणा साधला. राज्य सरकारने 32 हजार कोटींचं मदत पॅकेज जाहीर केल्यानंतरही पवारांच्या राष्ट्रवादीने काळी दिवाळी साजरी केली. लोकांनी आता त्यांच्यावर विश्वास ठेवणं थांबवलं आहे. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी ते आंदोलनाचा आधार घेत आहेत, असा टोला विखे पाटलांनी लगावला.

विखे पाटील यांनी सांगितलं की, दिवाळीनंतर ते सर्व ओबीसी नेत्यांना बोलावून न्यायमूर्ती शिंदे यांच्या उपस्थितीत विषयावर चर्चा करतील. मनोज जरांगे यांनी प्रामाणिकपणे आंदोलन केलं आहे; पण समाजात फूट पाडणं चुकीचं आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!