Karuna Sharma On Dhananjay Munde: बीडमध्ये शुक्रवारी ओबीसी समाजाच्या महाएल्गार सभेला ओबीसी नेते छगन भुजबळ, माजी मंत्री धनंजय मुंडे आणि राज्यातील इतर प्रमुख ओबीसी नेते उपस्थित होते. या सभेनंतर करुणा शर्मा यांनी माध्यमांद्वारे आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत अनेक खुलासे केले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे की, धनंजय मुंडे यांच्याविरोधात त्या निवडणुकीला उभ्या राहिला, मात्र त्यांचा अर्ज रद्द केला गेला. समाजाच्या लोकांना न्याय मिळत नाही. मंत्री असताना लोकांचे हक्क हिरावले गेले. शेतकऱ्यांच्या जमिनीही घेतल्या गेल्या. मी आहे तोपर्यंत समाजाचे खच्चीकरण होऊ देणार नाही. धनंजय मुंडे म्हणतात जीआर कळतो का? त्यांना विचारा तुम्हाला जीआर कळतो का? असा सवाल यावेळी करुणा मुंडे यांनी उपस्थित केला.
हेही वाचा –विखार पसरवणाऱ्या विखेंना सोडणार नाही; छगन भुजबळ यांचा इशारा
दरम्यान, करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, माझी आई मनोरमा शर्मा आणि माझ्या ड्रायव्हरची हत्या केली. माझ्या बहिणीवर बलात्कार केला. स्वतःच्या बायकोला न्याय देता आला नाही, तो समाजाला कसा न्याय देणार? आधी साखर कारखान्याच्या जमिनी द्या. माझ्या आईने यांच्या दबावात आत्महत्या केली, माझ्या बहिणीने सांगितले नंतर मला कळालं, असा दावाही यावेळी करुणा शर्मा यांनी केला आहे.
चार-पाच दिवसांपूर्वी मी जरांगे-पाटील यांना भेटले, परंतु त्यांनी सांगितले की हे घरगुती प्रकरण आहे, त्यामुळे काही केले जाऊ शकत नाही. करुणा शर्माने यांनी पुढे म्हटलं की, सभेनंतर जनतेला प्रश्न विचारणे आवश्यक आहे. माझ्यावर वाल्मीक कराड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात हल्ला केला, विविध प्रकरणे दाखल केली गेली. माझी बहिण इंदौरला गेली. तिला योग्य पाठिंबा मिळाल्यास तीही बोलेल. निवडणुकीच्या वेळी यांना समाज दिसतो, असंही करुणा मुंडे यांनी यावेळी नमूद केलं.


