Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

गुजरातमधला राजकीय भूकंप पाहून महाराष्ट्रातले मंत्री धास्तीत? इथंही राजकीय बदल झाल्यास ‘हे’ मंत्री येणार धोक्यात

गुजरातमधला राजकीय भूकंप पाहून महाराष्ट्रातले मंत्री धास्तीत? इथंही राजकीय बदल झाल्यास ‘हे’ मंत्री येणार धोक्यात

नागपूर : गुजरातमध्ये भाजपने नुकताच राजकीय भूकंप घडवल्यानंतर संपूर्ण देशात राजकीय खळबळ उडाली आहे. भाजप सरकार असलेल्या राज्यात तर आणखी भिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे घेतले. त्यानंतर, आता शेजारच्या महाराष्ट्रातही मंत्रिमंडळात बदलाची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्ये या घडामोडींमुळे तणाव निर्माण झाला आहे.

महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर, इथंही भाजप सरकार आहे. त्यातही ३ पक्षांचा सरकार असल्याने मित्र पक्षातले मंत्री सध्या धास्तीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ ५ डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण करत आहे. त्या निमित्ताने ते आपल्या सरकारचे आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या कामगिरीचे ऑडिटकरण्याचे आदेश देण्याची योजना आखत आहेत. हा अहवाल आल्यानंतर काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. “गुजरातमध्ये जे काही घडले ते अडीच वर्षांनंतर झाले. महाराष्ट्राला अजून एक वर्षही पूर्ण झालेले नाही,” असे सांगून त्यांनी तातडीने फेरबदल होण्याची शक्यता सध्या नाकारली. मात्र, त्याचवेळी त्यांनी मंत्र्यांच्या कामगिरीचे ऑडिट होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातले मंत्री आपली कारकीर्द सुधारण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याशिवाय, फेरबदलाची टांगती तलवार कायम ठेवली आहे.

हे विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही मंत्र्यांसाठी चिंतेचे कारण आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचार आणि अनियमिततेचे आरोप आहेत.

या मंत्र्यांवर ‘टांगती तलवार’

अलीकडील पावसाळी अधिवेशनादरम्यान, गृह आणि महसूल मंत्री योगेश कदम, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड हे विरोधी पक्षांचे लक्ष्य ठरले होते. कदम यांच्यावर बेकायदेशीर वाळू व्यापार आणि डान्स बारच्या कारभारावरून आरोप झाले होते. मुख्यमंत्र्यांच्याऑडिट’च्या घोषणेनंतर या तीनही मंत्र्यांवरील दबाव वाढला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या भूमिकेमुळे महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्ये धाकधूक वाढली असून, कामगिरी ऑडिटच्या अहवालानंतरच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे भविष्य ठरणार आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!