Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Maharashtra Politics : पुण्यात एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता सोडणार साथ

Maharashtra Politics : पुण्यात एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता सोडणार साथ

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला पुण्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील तरुण आणि लोकप्रिय नेते अतुल देशमुख हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ते लवकरच शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करून धनुष्यबाण हाती घेणार आहेत. यामुळे शिंदे गटाची उत्तर पुणे जिल्ह्यातील ताकद वाढेल आणि राष्ट्रवादीला आणखी एक मोठा फटका बसणार आहे. ही राजकीय हालचाल जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांच्या तोंडावर घडत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अतुल देशमुख हे लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादीत तुतारी फुकणारे नेते म्हणून ओळखले जातात. आता ते धनुष्यबाण स्वीकारून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होणार आहेत. उत्तर पुणे जिल्ह्यात तरुणांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या विजयात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले जाते.

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या मनात नाराजी निर्माण झाली असून, पक्षांतर्गत दुफळीमुळे हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. या प्रवेशाने शिंदे गटाला उत्तर पुणे जिल्ह्यात मजबूत नेतृत्व मिळेल आणि नवे राजकीय समीकरण घडवणारी ही घटना ठरणार आहे.

तीन जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला हा धक्का एकटाच नाही. नुकतेच १५ ऑक्टोबरला बुलढाणा, हिंगोली आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या जिल्हाध्यक्षांनी अचानक पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे पक्षाला मोठा फटका बसला आहे. हे नेते राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही शरद पवार यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहिले होते.

मात्र, आगामी निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी तडकाफडकी ‘जय महाराष्ट्र’ करत पक्ष सोडला. हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, बुलढाण्याच्या जिल्हाध्यक्षा रेखे खेडेकर आणि अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके या तिघांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीची पायाभूत रचना हादरली आहे. या राजीनाम्यामुळे पक्षाच्या स्थानिक पातळीवरील संघटना कमकुवत झाली असून, शरद पवार गटाला सतत धक्के बसत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!