पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रीयीकृत बँक अशी ओळख असलेल्या बँक ऑफ इंडिया येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
बँक ऑफ इंडिया येथे अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला देशभरात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत ४०० रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी.
– एकूण रिक्त पदे : 400 पदे.
– नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.
– वेतन / मानधन : १३०००
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 25 डिसेंबर 2025.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2026.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://bankofindia.co.in/
अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


